
‘कोरोना’ व्हायरस हे एक मोठे आव्हान आहे; परंतु सोबतच ही एक संधीही आहे. आपल्या देशातील वैज्ञानिक, इंजिनिअर्स आणि डेटा एक्सपर्टस् यांना एकत्र आणून संकटकाळात उपाय शोधण्याची गरज आहे, असे आशादायक आणि सकारात्मक ट्विट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे.
राहुल गांधी यांनी यापूर्वी वेळोवेळी सरकारला सूचना केल्या आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिले आहे. दोन दिवसांपूर्वी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकार परिषदेत राहुल गांधीनी कोरोनाविरुद्ध लढाई एकजुटीने लढण्यासाठी सरकारला उपाययोजना सुचविल्या होत्या. आज त्यांनी ट्विट केले आहे. कोरोना व्हायरस हे निश्चित मोठे संकट आहे. मात्र, आपल्या देशातील तज्ञांच्या मदतीने अभिनव उपायांद्वारे या आजाराशी लढण्याची एक संधी आहे. संकटावर उपाय शोधून काढण्यासाठी वैज्ञानिक, इंजिनिअर्स आणि डेटा एक्सपर्टस् यांना एकत्र आणण्याची गरज आहे, असे राहुल गांधीनी म्हटले आहे.
























































