
देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 16 हजाराच्या पार गेला आहे. गेल्या 24 तासात देशात 1334 कोरोनाचा नवे रुग्ण आढळून आले असून 27 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी देशातील कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा देखील पाचशेच्या पार गेला आहे. आरोग्य मंत्रालयाने घेतलेल्य़ा पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
1334 new #COVID19 cases & 27 deaths have been reported in last 24 hours, taking total cases to 15712 & deaths to 507 in India. No new case reported in Mahe in Puducherry & Karnataka’s Kodagu in the last 28 days. Lav Aggarwal, Joint Secretary, Union Health Ministry pic.twitter.com/YsaMPJOnx5
— ANI (@ANI) April 19, 2020
‘सध्या देशात कोरोनाचे 15हजार 712 रुग्ण असून त्यातील 2231 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांचा आकडा देखील रविवारी पाचशेच्या पार गेला असून आतापर्यंत 507 जणांचा मृत्यू झाला आहे. असे आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
54 other districts in 23 States/Union Territories didn’t report any cases in last 14 days. 2,231 patients have been cured so far in the country: Lav Aggarwal, Joint Secretary, Union Health Ministry https://t.co/qoNzrqtodO
— ANI (@ANI) April 19, 2020
सध्या देशातील 23 राज्यातील 54 जिल्ह्यात गेल्या 14 दिवसात कोरोनाचा एकही रिग्ण आढळलेला नाही. तर कर्नाटकातील कोडगू व पुदुच्चेरीतील माहे जिल्ह्यात गेल्या 28 दिवसात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, असे अगरवाल यांनी सांगितले. तर सध्या देशात 755 रुग्णालय हे फक्त कोरोना ग्रस्तांसाठी काम करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.



























































