
कोरोना व्हायरसची चाचणी करण्यासाठी सध्या आपल्याला आयात करण्यात येणाऱ्या किट्सवर अवलंबून राहावे लागते. मात्र मे महिन्यात या चाचणीसाठी लागणाऱ्या 10 लाख स्वदेशी किट्स बनवण्यात येणार असून महिनाभरात 6 हजार व्हेंटिलेटर उत्पादन करण्याची योजना असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशात सध्या खास कोरोनासाठी 1919 रुग्णालये असून 1.73 लाख आयसोलेशन बेड तसेच 21,800 आयसीयू बेड उपलब्ध आहेत. कोरोनाची चाचणी करण्यासाठी वापरण्यात येणारी किट सध्या आयात करण्यात येते. देशातही या किटचे उत्पादन सुरू आहे.























































