
हिंदुस्थानी बँकांना 9 हजार कोटी रुपयांचा चुना लावून फरार झालेला उद्योजक विजय मल्ल्या याला लंडनच्या न्यायालयाने दणका दिला आहे. कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी हिंदुस्थानी सरकारकडे प्रत्यार्पण करण्याविरोधात केलेली मल्ल्याची याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
इंग्लंड आणि वेल्स उच्च न्यायालयाने आज 20 एप्रिल रोजी मल्ल्याची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे आता विजय मल्ल्याला हिंदुस्थानकडे सोपविण्याचा निर्णय इंग्लंडमधील गृह सचिव प्रिती पटेल यांच्याकडे जाणार आहे. त्यांना या विषयावर अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे. ते नेमका काय निर्णय घेतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
UK court dismisses Vijay Mallya's appeal against extradition to India
Read @ANI Story | https://t.co/Iu1z0uIEyl pic.twitter.com/39XP8q1fEC
— ANI Digital (@ani_digital) April 20, 2020
























































