
कोरोनाच्या लढाईत डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. पण काही ठिकाणी त्यांच्यावर हल्ले होत आहेत. केरळमध्ये एका डॉक्टरचा मृत्यू झाला. त्यांना दफन करायला गेलेल्या नातेवाईक आणि डॉक्टर कर्मचार्यांवर जमावाने हल्ला केला. त्यात अनेक लोक जखमी झाले आहेत.
केरळमध्ये एका 55 वर्षीय न्युरोसर्जन डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांचा मृतदेश दफन करण्यासाठी त्यांचे काही नातेवाईक आणि काही सहकारी कर्मचारी कब्रस्तान मध्ये जात होते. तेव्हा 200 लोकांच्या जमावाने त्यांना अडवले. तसेच इथे दफन करण्यास त्यांनी विरोध दर्शवला. बघता बघता जमाव हिंसक झाला, जमावाने नातेवाईक आणि डॉक्टरांवर लाथी काठ्यांनी मारहाण केली केली. तसेच त्यांच्यावर डगडफेकही केली. डॉक्टर आणि नातेवाईकांनी वेळीच पळ काढला म्हणून त्यांचा जीव वाचला. उपस्थित जमावाने रुग्णवाहिकेची तोडफोड केली. नंतर कडक पोलिसांच्या बंदोबस्तात मृत डॉक्टरांचा मृतदेह दफन करण्यात आला.






















































