
लॉकडाऊन आणि संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू असतानाही कायदा धाब्यावर बसवणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. गेल्या तीन आठवड्यात कल्याण-डोंबिवलीतील 1025 वाहने जप्त करण्यात आली आहे तरीही काही महाभाग विनाकारण गाड्या फिरण्यात धन्यता मानत आहेत. यावर पोलिसांनी नामी शक्कल शोधली आहे. कायदेशीर कारवाई करतानाच किमान शंभर मीटर रस्त्यावरून सरपट जाण्याची शिक्षा केली जात आहे. कल्याण पूर्वमध्ये या युक्तीनंतर अनेकांनी वाहने रस्त्यावर आणणे बंद केले आहे.
इकडे तिकडे कुठे भटकल तर चौदा दिवस क्वारंटाईन
कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. आता आपला परिसर सोडून अन्यत्र फिरणाऱ्यांना पकडून थेट 14 दिवस क्वारंटाईन कक्षात रवानगी केली जाणार आहे. नव्या नियमांची अंमलबजावणी मंगळवारपासून सुरू करण्यात आली असून आयरे गावातील काही लोकांना क्वारंटाईन कक्षात हलवण्यात आले आहे. गावातील काही व्यक्ती सोनारपाडा, कल्याण-शीळ रोड, डोंबिवली पूर्व या भागात फिरत आहेत. आयरेगाव हा भाग कोरोना कंटेनमेंट झोनमध्ये येत असल्याने याबाबत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून काही व्यक्तींना वसंत व्हॅली येथील क्वारंटाईन कक्षात दाखल केले. पुढील 14 दिवस त्यांना त्याच ठिकाणी राहावे लागणार आहे. यापुढेही कोरोना कंटेनमेंट झोनमधील नागरिक इतर भागात गेले असल्याचे आढळून आल्यास त्यांना देखील महापालिकेच्या क्वारंटाईन कक्षात हलवले जाईल
विनापरवानगी नवी मुंबईतून बाहेर गेलात तर गाड्यांना शहरात पुन्हा नो एंट्री
राज्य सरकारने जाहीर केलेल्या लोकांच्या कालावधीत ज्या वाहन चालकांकडे पासेस आहेत त्यांनी शहराच्या बाहेर जावे परवानगी न घेता शहरातून बाहेर गेलेल्या वाहनांना पुन्हा शहरात प्रवेश दिला जाणार नाही असा इशारा नवी मुंबईचे पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी दिला लोक भाऊंचे काही नियम कालपासून शितल झाले आहे त्याचा फायदा घेऊन अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर उतरताहेत वाशी आणि मुलूंड टोल नाक्यावर वाहनांची मोठी गर्दी होत आहे विनाकारण रस्त्यावर उतरणाऱ्या वाहनांना अटकाव करण्यासाठी पोलिसांनी कळत नाकाबंदी केली आहे ज्या वाहनचालकांकडून शहरातून बाहेर जाण्यासाठी परवानगी असेल त्यांनी शहराच्या बाहेर जावे विनापरवानगी नवी मुंबईतून बाहेर गेलेल्या वाहनांचा परतीचा मार्ग बंद करण्यात आला आहे या वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई होणार असून त्यांना पुन्हा शहरात प्रवेश दिला जाणार नाही.
























































