सोलापूरमध्ये कोरोनाचे 33 रुग्ण, जिल्हाधिकार्‍यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापुरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 33 वर पोहोचली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही माहिती  दिली.

सोलापुरात आतापर्यंत 900 जणांची  कोरोना चाचणी करण्यात आली आहे .यापैकी 744 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 711 अहवाल निगेटिव्ह आले असून 33 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.   आज एका दिवसात 90 रिपोर्ट प्राप्त झाले. यातील 87 निगेटिव्ह तर 3 पॉझिटिव्ह अहवाल आहेत. चार दिवसापूर्वी येथील एक कोरोना बाधित महिला मृत्यु पावली होती, तिच्याशी संपर्कातील हे नातेवाईक आहेत.

सोलापूर शहरातील विविध भागात आरोग्य विभागामार्फत तपासणी सुरू आहे. नागरिकांना स्वतःहून पुढे येऊन तपासणी करून घ्यावी असे आवाहन प्रशासनने केले आहे.