भाजप आमदाराच्या पत्रावर तरुणीचा मुंबई ते संगमनेर प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यांच्या सीमा बंद असूनही मेडिकल कॉलेजच्या एका विद्यार्थिनीने भाजप आमदाराच्या पत्रावर मुंबई ते संगमनेर असा प्रवास केल्याची घटना गुरुवारी घडली आहे. दरम्यान घरमालकाने तिला मज्जाव केल्याने तिला संगमनेरातून माघारी जावे लागले.

मुंबईतील एक तरुणी संगमनेर मधील होमिओपॅथी कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात शिकत आहे.  जूनमध्ये परीक्षा असल्याने तिला संगमनेरला यायचे होते. यासाठी तिने भाजपच्या मुंबईतील एका आमदाराकडून पत्र घेतले या पत्रात सदर आमदारांनी या विद्यार्थिनीला संगमनेर येथे जाण्यास पोलीस आणि प्रशासनाने मदत करावी असे म्हटले आहे. या पत्राच्या आधारे ही विद्यार्थिनी कारमधून संगमनेरला पोहोचली. ती संगमनेर येथील आपल्या रूमवर आली असा घरमालकाने तिला रूम देण्यास मज्जाव केला, यामुळे तिला संगमनेर मधून बाहेर पडावे लागले. त्यानंतर ती विद्यार्थिनी कुठे गेली हे समजू शकले नाही.

सदर तरुणी संगमनेर येथील एका मेडिकल कॉलेजच्या शेवटच्या वर्षाची विद्यार्थिनी आहे घेऊन मध्ये परीक्षा असल्याने ती संगमनेरला आली होती मात्र तिच्या घर मालकांनी तिला घरात प्रवेश करू दिला नाही प्रशासनातील आहोम कारण टेन होण्यास सांगितले मात्र तसे न करता तिची राहण्याची व्यवस्था न झाल्याने ती पुन्हा निघून गेली आहे-शशिकांत मंगरुळे प्रांताधिकारी, संगमनेर