
बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्री उर्वशी रौतेला सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती तिच्या भूमिकांपेक्षा लव्ह लाईफमुळे जास्त चर्चेत असते. अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावरीही खूप अॅक्टीव असते. लॉकडाऊन मध्ये उर्वशी सोशल मीडियावर आपले बोल्ड फोटो शेअर करून तिच्या अनेक चाहत्यांचे मनोरंजन करत होती. मात्र आता याशीच जोडलेली एक बातमी समोर येत आहे. उर्वशीचे एका अज्ञात इसमाने फेसबुक अकाउंट हॅक केले आहे. याबाबत स्वतः उर्वशीने ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे. याप्रकरणी तिने मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
फेसबुक अकाउंट हॅक झाल्याच्या उर्वशीच्या तक्रारीनतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. याबाबत मुंबई पोलिसांनी ट्विट करत म्हंटलं आहे की, आम्ही तुमची तक्रार सायबर पोलिसांना फॉरवर्ड केलेली आहे. दरम्यान, उर्वशी रौतेला हिचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. याआधीही 2017 मध्ये तिचे अकाउंट हॅक झाले होते. याची माहिती तिने ट्विटरद्वारे आपल्या चाहत्यांना दिली आहे. उर्वशीचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्यानंतर तिच्या अकाऊंटवरून अनेक आपत्तीजनक पोस्ट केल्या गेल्या होत्या. ज्यामुळे तिला मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. पोलीस या अज्ञात हॅकरचा शोध घेत आहेत.
My Facebook has been hacked please don’t respond to any messages or post as it is not done by me or my team @Facebook @facebookapp
— URVASHI RAUTELA (@UrvashiRautela) April 24, 2020
We have forwarded your complaint to Cyber police station.
— Mumbai Police (@MumbaiPolice) April 24, 2020






























































