
लॉकडाऊनमुळे अक्षय्य तृतीयेचा सण घरात राहून साजरा केला जात आहे. यादिवशी घराघरात आमरस आणि पूरण पोळीचा बेत असतो. पण ज्यांचे हातावर पोट आहे त्याच्या घरात गेल्या 35 दिवसापासून मुश्कीलीने चूल पेटू शकली आहे. अशा गोरगरिबांच्या आयुष्यात दोन क्षण समाधानाचे यावेत यासाठी नगर शहर शिवसेनेच्या वतीने सुरु असलेल्या अन्न छत्रात गोड भाताचे वाटप करण्यात आले. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने भुकेलेल्या कष्टकरी कामगार कुटुंबियांचे तोंड गोड करण्यात आले.
नगर कल्याण रोडवर शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिवसेना शहर जिल्हा उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव, शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, मंदार मुळे, टिनू भंडारी, विशाल वालकर, मनीष गुगळे, मेहुल भंडारी, अजय भोयर, संजय वल्लाकट्टी, शशिकांत देशमुख, राजू औटी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अनिल राठोड म्हणाले की, नगर जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिह, पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके, महानगर पालिकेचे अधिकारी, आरोग्य खाते, पोलीस यांनी उत्तम प्रकारे काम केले. त्याला नगरकरांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले. त्यामुळे नगर शहरातील बाधित रुग्णांमध्ये एकही स्थानिक रुग्ण नाही. शहरात कोरोना कर्फ्यू सुरु होण्याअगोदरपासून शिवसेनेने शहरातील पहिले अन्न छत्र सुरु केले आहे. सामाजिक अंतराचे आणि कोरोना कर्फ्यूचे नियम पाळून दररोज 3 हजारपेक्षा जास्त फूड पॅकेट्सचे वाटप शिवसेनेेचे कार्यकर्ते गेल्या महिनाभरापासून करत आहेत. आतापर्यंत एक लाखपेक्षा जास्त फूड पॅकेट्सचे वाटप शिवसेनेने नगर शहरात केले आहे.






























































