कोपरगावात पाच दिवसात एकही संशयित आढळला नाही; 57 पैकी 56 अहवाल निगेटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोचा फैलाव रोखण्यास तालुका प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा यश मिळत आहे. कारण गेल्या पाच दिवसात शहरासह तालुक्यात एकही संशयित आढळला नाही. तर दुसरीकडे 57 पैकी 56 तपासणी अहवाल  निगेटिव्ह आल्यानंतर एकही अहवाल पेंडिंग नसल्याने अहवालाची प्रतिक्षा संपली असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.

दरम्यान, 9 एप्रिल रोजी या सदर महिलेला  लक्षणे दिसू लागल्याने जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. 10 एप्रिल रोजी तिचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने कोपरगाव शहरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर तालुका प्रशासन व आरोग्य यंत्रणा  वेगाने कामाला लागली कोपरगाव तालुक्यातून एकूण 57 अहवालापैकी 56 अहवाल आतापर्यंत प्राप्त झाले आहेत. सर्व निगेटिव्ह आलेले आहेत. तर शहरातील लक्ष्मीनगर येथील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्या  अहवाल  पॉझिटिव्ह निघालेल्या महिलेचा 14 एप्रिल रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

अधिक माहिती देताना डॉ. कृष्णा  फुलसौंदरम्ह  शहरासह तालुक्यात आरोग्य सेविका आशा सेविका 37 पथके घरोघर जाऊन प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची माहिती जमा करीत आहे परंतु गेल्या पाच दिवसात एकाही ठिकाणाहून एकाही संशयिताची माहिती प्राप्त झाली नाही मात्र दोन दिवसापूर्वी लक्ष्मीनगर येथील एक रुग्ण शिर्डी येथून परस्परच नगर येथे तपासणीसाठी गेला होता परंतु त्याचाही अहवाल  निगेटिव्ह आला असल्याचेही डॉ. फुलसौंदर यांनी सांगितले.

निगेटिव्ह आलेले रुग्ण व  पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या त्या सर्व 32 जणांना एका हॉटेलमध्ये विलिनीकरण कक्षात ठेवण्यात आले होते  त्या सर्वांना शहरातील विविध संस्था-संघटना दानशूर व्यक्ती यांच्याकडून उत्तम प्रकारचा नाश्ता जेवण पुरविले जात होते परंतु त्यापैकी 19 जणांना सुखरुप घरी सोडण्यात आले आहे. उर्वरित 13 जण अजूनही विलिनीकरण कक्षात आहेत. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष विधाटे यांनी दिली.