संभाजीनगर शहरात आणखी 10 जणांना कोरोनाचा संसर्ग, बाधितांची संख्या 105 वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो- प्रातिनिधीक

संभाजीनगर शहरात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 10 ने वाढली असून रुग्णांचा आकडा शंभरी पार गेला आहे. गेल्या 24 तासात 50 हुन अधिक रूग्णांची भर पडल्याने आता कोरोना बधितांचा एकूण आकडा 105 वर पोहोचला आहे. घाटी रुग्णाल्याच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.

मंगळवारी सापडलेल्या रुग्णांमध्ये शहरातील संजय नगर मुकुंदवाडी येथील 2, किल्लेअर्क मधील 1, पैठणगेट भागातील 4, भिमनगर भाऊसिंगपुरा येथील 1 तर शहरातील सिल्लेखाना येथील बडा तकिया मशिद भागातील 1 या शहरातील 9 रुग्णांसह दौलताबाद येथील एका रुग्णांचा समावेश आहे. या नव्या 10 रुग्णांसह आता शहरातील कोरोना बाधितांची संख्या आता 105 वर पोहोचल्याचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.

याआधी शहरात मंगळवारची सकाळ ही प्रचंड धक्का देणारी ठरली. सकाळीच सात वाजता शहरात आणखी नवे 13 रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली. या 13 रुग्णांपैकी 6 जण 16 वर्षाखालील मुले आहेत तर 7 जण 44 वर्षांच्या खालील याची माहिती घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. या 13 जणांसह संभाजीनगर मधील कोरोना रूग्णांची एकूण संख्या 95 वर पोहोचली आहे. दुपारी चारच्या दरम्यान आणखी 10 रुग्ण आढळल्याने हा आकडा 105 झाला.