नगरमध्ये गणेश कारखान्याच्या परिसरात आग, सुदैवाने जिवीतहानी नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राहता तालुक्यातील गणेश साखर कारखान्याच्या मोलेषियश व गोडाऊनच्या परिसरात असलेल्या कचऱ्याला  अचानक आग लागली. त्यामुळे येथील बैलगाडी व सरपनाने पेट घेतल्यामुळे परिसरात धुराचे साम्राज्य तयार झाले. सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी झाली नाही.

बुधवारी दुपारी 2:30 च्या सुमारास कारखान्याच्या साखरेचे गोडाऊन व मोलेषियशच्या असलेल्या टाकीच्या शेजारी आग लागली. या भागात मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले होते. त्या ठिकाणी असलेला वेल कारखान्याच्या आवारत घुसला होता. हा वेल बाहेरच्या बाजूने आतील गवतानी पेट घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात आगीने भडका घेतला.  ही आग लागल्याचे लक्षात येताच  राहता नगरपालिका  अग्नीशमन, शिर्डी नगरपंचायत, साई बाबा संस्थानचे अग्नीशमन, प्रवरा कारखान्याच्या, आणि गणेश कारखान्याच्या  या अग्नी शमन दलांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आणली. या गळीत हंगामामुळे गणेश कारखाना बंद असल्यामुळे मोलेषियशच्या टाकीत कुठलेही केमिकल नसल्या मुळे मोठा अनर्थ टळला. मात्र या भागात लावलेल्या बैल गाड्या व कारखान्याच्या सरपण काही प्रमाणात जळाले आहे.