अकोला- 58 अहवालांपैकी आठ पॉझिटीव्ह, 50 निगेटिव्ह; एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
corona-virus-new-lates

शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अकोला जिल्ह्यातील कोरोना संसर्ग तपासणीचे 58 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 50 अहवाल निगेटीव्ह तर आठ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान शुक्रवारी दाखल झालेल्या एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आता पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या 40 झाली असून प्रत्यक्षात 24 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजअखेर एकूण 770 नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 729 अहवाल आले आहेत. आज अखेर एकूण 689 अहवाल निगेटीव्ह तर 40 अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व 41 अहवाल प्रलंबित आहेत.

आजपर्यंत एकूण 770 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 602, फेरतपासणीचे 94 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 74 नमुने होते. आजपर्यंत एकूण 729 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 561 तर फेरतपासणीचे 94 व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 74 अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 689 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 40 आहेत. शनिवारी प्राप्त झालेल्या 58 अहवालात 50 अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर आठ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

आता सद्यस्थितीत 40 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील पाच जण मयत आहेत. तर गुरुवारी सात जण व सोमवारी एका जणास व गुरुवारी तिघांना असे 11 जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत 24 जण उपचार घेत आहेत. दरम्यान, शुक्रवारी पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या 79 वर्षीय पुरुष रुग्णाचे उपचारा दरम्यान निधन झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून देण्यात आली.

एकाच दिवशी आठ पॉझिटीव्ह
शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता अहवाल प्राप्त झाले तेव्हा सहा जण पॉझिटीव्ह रुग्ण आढळले होते. तर सायंकाळी पाच वाजता प्राप्त अहवालात दोघा जणांचे अहवाल प्राप्त झाले. असे दिवसभरात आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. सकाळी प्राप्त अहवालातील एक रुग्ण हा मोहम्मद अली रोडवरील रहिवासी आहे. तर अन्य पाच हे अकोट फैल, मेहेरनगर, सुधीर कॉलनी, शिवाजी नगर, कमलानगर अशा पाच वेगवेगळ्या भागातील रहिवासी आहेत. हे पाचही जण एकाच खाजगी रुग्णालयात काम करतात. त्यात डॉक्टरचाही समावेश आहे. 28 एप्रिल रोजी अत्यवस्थ अवस्थेत दाखल ज्या महिला रुग्णाचा लगेचच मृत्यू झाला होता, त्या महिलेच्या संपर्कात हे पाचही जण आले होते. शासकीय रुग्णालयात येण्याआधी ती महिला या खाजगी रुग्णालयात गेली होती. तर सायंकाळी अहवाल आलेले रुग्णांत एका 30 वर्षीय महिलेचा समावेश असून अन्य एक 40 वर्षीय पुरुष आहे आणि ते फतेह चौक व बैदपूरा या भागातील रहिवासी आहेत, त्यांचे संपर्क शोधण्याचे काम सुरु आहे.