
मुंबईतील चिंचपोकळी येथील गणेश टॉकिज परीसरातील प्रसिद्ध गणेश मूर्तीकार विजय खातू यांच्या गणेश मूर्ती कार्यशाळेला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत कार्यशाळेचं मोठं नुकसान झाल्याचे समजते आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. रात्री साडे आठवाजेपर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. दरम्यान, या आगी मध्ये कुठलीही जीवित हानी झाली नसून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे बोलले जात आहे.































































