
मुंबई एअरपोर्ट विभागात कस्टमच्या सुपरिंटेंण्डपदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांने शनिवारी जेएनपीटी बंदरातील जेट्टीवरुन समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली आहे. बिनोय नायर असे त्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
बिनोय नायर हे मागील अनेक दिवसांपासून मानसिक व्याधिग्रस्त झाले होते. या मनस्थितीत नायर जेएनपीटी बंदरात गेले होते. त्यानंतर त्यांनी जेएनपीटी बंदरातील जेट्टीवरुन समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. उडी घेताना तेथील कामगारांनी बघितले होते. त्यावेळी जवळच काम करीत असलेल्या बोटीवरील कामगारांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अधिकाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र समुद्रातुन बाहेर काढण्याआधीच त्यांचा दुदैवाने मृत्यू झाला असल्याची माहिती न्हावा-शेवा बंदर विभागाचे एसीपी विठ्ठल दामगुडे यांनी दिली.






















































