प्रतीक्षा संपली, ‘या’ तारखेला लॉन्च होतोय 108 मेगापिक्सलचा दमदार स्मार्टफोन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फोटो काढायची आणि काढून घेण्याची आवड असणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी शाओमी (Xiaomi) हिंदुस्थानमध्ये नवीन स्मार्टफोन Mi 10 लॉन्च करत आहे. याची तारीखही जाहीर झाली असून 8 मे पासून याची विक्री सुरू होईल. लॉकडाऊनमुळे कोणताही इव्हेंट न घेता ऑनलाईन लाईव्हस्ट्रीमद्वारे हा फोन लॉन्च केला जाईल.
या स्मार्टफोनचे सर्वात खास आणि दिलखेचक वैशिष्ट्य म्हणजे 108 मेगापिक्सला कॅमेरा.

screenshot_2020-05-04-18-28-29-794_com-android-chrome

Mi 10 स्मार्टफोनला पाच कॅमेरे देण्यात आले आहेत. स्मार्टफोनला चार रिअर कॅमेरे आणि एक सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सल, 13 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड लेन्स, 2 मेगापिक्सलची डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मायक्रो लेन्स आहे. सेल्फीसाठी 20 मेगापिक्सलचा फ्रन्ट कॅमेरा देण्यात आला आहे. या खास वैशिष्ट्यामुळे बाजारमध्ये याला तुफान मागणी येईल अशी आशा कंपनीला आहे. 108 मेगापिक्सल कॅमेऱ्यावाला हा स्मार्टफोन तीन व्हेरिएन्टसमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

images-9

स्मार्टफोनच्या बेस मॉडेलला 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तर दुसऱ्या व्हेरिएन्टसमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज आणि तिसऱ्या व्हेरिएन्टसमध्ये 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. चिनी मार्केटमध्ये याची सुरुवातीची किंमत 3999 युआन (42, 500 रुपये) होती. हिंदुस्थानमधील किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

images-10

स्मार्टफोनचे वैशिष्ट्य –

– चार रिअर कॅमेरे आणि एक सेल्फी कॅमेरा
– प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सल आणि सेल्फीसाठी 20 मेगापिक्सलचा फ्रन्ट कॅमेरा
– स्मार्टफोन तीन व्हेरिएन्टसमध्ये लॉन्च
– 6 जीबी, 8 जीबी आणि 12 जीबी रॅमच्या व्हेरिएन्टसचा पर्याय
– 6.67 इंचाची फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले
– Qualcomm Snapdragon 730G प्रोसेसर
– 4780 mAh ची दमदार बॅटरी