
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. या काळात फक्त जीवनावश्यक वस्तू मिळतील असे सरकारने जारी केले आहे. असे असले तरी पान तंबाखूचे शौकीन बैचेने झाले आहेत. तंबाखू न दिल्याने दोन तरुणांनी एकाचा चावा घेतला आहे, तसेच त्याला मारहाणही केली आहे.
राजस्थानच्या जोधपूरमध्ये दोन तरुणांनी एका व्यक्तीकडे तंबाखू मागितली. त्या व्यक्तीने तंबाखू देण्यास नकार दिला. या गोष्टीचा दोघांना चांगलाच राग आला. दोघांनी त्याला मारहाण केली. त्याच्या ओठावर, पाठीवर आणि कंबरेवर जोरदार चावा घेतला. पीडित व्यक्ती जोर जोरात ओरडल्याने पोलीस धावत आले आणि आरोपींना ताब्यात घेतले.






















































