
छत्रपती शाहू महाराज यांचा आज स्मृतीदिन असल्याने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसह सर्वजण शाहू महाराजांना शब्द सुमनांजली अर्पण करत आहेत. विविध पक्षाच्या नेत्यांनी सोशल मीडियावर छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करत पोस्ट लिहिल्या आहेत. मात्र अशी पोस्ट लिहिताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शाहू महाराज यांना ‘सामाजिक कार्यकर्ते’ म्हणून संबोधले ज्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.

‘थोर सामाजिक कार्यकर्ते, वंचितांचे शिक्षण, हक्कांचा पुरस्कार करणारे छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांना स्मृतिदिनी शत शत नमन!’ असे शब्द आणि फोटो देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर अपलोड केला. त्यानंतर नेटकाऱ्यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. चूक लक्षात येताच फडणवीस यांच्या ट्विटर हँडल वरून पोस्ट उडवण्यात आली आणि एक नवीन पोस्ट शेअर करण्यात आली. ज्यामध्ये ‘सामाजिक क्रांतीचे जनक वंचितांचे शिक्षण, हक्कांचा पुरस्कार करणारे छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांना स्मृतिदिनी शत शत नमन!’ असे म्हणत फडणवीस यांनी व्हिडीओ देखील अपलोड केला आहे. अपलोड करण्यात आलेल्या व्हिडीओतून फडणवीस यांनी महाराजांना अभिवादन तर केले, मात्र आधीच्या पोस्टमधील चुकीबद्दल माफी मागितली नाही. यामुळे जनतेत संतापाची लाट उसळली आहे. नेटकाऱ्यांनीही टीका करत आपला संताप व्यक्त केला आहे.
बहुजनांच्या राजाबद्दल तुम्ही वापरलेल्या शब्दांबद्दल जाहीर माफी मागा..#ShameOnYouFadanvis
— महाराष्ट्रप्रेमी पुणेकर.! (@OfficeOfPunekar) May 6, 2020
पोस्ट करण्यापूर्वी अभ्यास करून करत जा आणि चुकलं की माफी पण मागत जा हो, अभ्यासू मा. मु. #ShameOnYouFadanvis
— Pooja Subhash (@Pooja_Subhash_) May 6, 2020
नुसते ट्विट डिलीट करुन चालणार नाही. फडणवीसांनी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावर जाऊन नाक घासून माफी मागावी.#ShameOnYouFadanvis
— Appa Jathar (@ATJathar) May 6, 2020




























































