लातूर जिल्ह्यातील  दुकानांसाठी जिल्हाधिकार्‍यांकडून वेळापत्रक जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव व प्रसार टाळण्यासाठी शहरी भागात सर्व प्रकारची दुकाने अत्यावश्यक व अत्यावश्यक नसलेली, असा भेदभाव न करता  जी गर्दीत थाटलेली नसून केवळ एकटेपणाने (Single) आस्तित्वात आहेत. ती सुरु ठेवण्यास मुभा आहे. परंतु या आदेशाची अंमलबजावणी करताना लातूर जिल्हयातील परिस्थिती प्रत्यक्षरित्या पाहता, सर्व प्रकारची दुकाने सुरू राहिल्याने मोठया प्रमाणावर गर्दी होऊन सोशल डिस्टन्स राखले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांकडून सोशल डिस्टन्स राखून कोरोनाचा प्रार्दुभाव होऊ नये या दृष्टीकोनातून गर्दी कमी होण्यासाठी आवश्यक उपयोजना करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी दुकाने सुरु ठेवण्यासाठी आठवड्यातील दिवस व वेळ निश्चित केली आहे.

सोमवार व मंगळवार रोजी ॲटोमोबाईल्स, कॉम्प्युटर/ इलेक्ट्रॉनिक, टायर्स, बॅटरी, रेडीमेड फर्नीचर, मोबाईल शॉपी हे सकाळी  8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत चालू राहतील. बुधवार व गुरुवार रोजी रेडीमेड कापड, कापड, भांडी, टेलरींग, फुटवेअर, रस्सी/ पत्रावळी, ज्वेलरी, जनरल स्टोअर्स, वॉच स्टोअर्स, सुटकेस व बॅग हे सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत चालू राहतील. शुक्रवार व शनिवार रोजी स्टेशनरी, कटलरी, सायकल स्टोअर्स, स्टील ट्रेडर्स, स्क्रॅप मर्चंट, हार्डवेअर, बिल्डींग मटेरीअल, पेंट, उर्वरीत आस्थापना हे सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत चालू राहतील.

रविवार वगळून दररोज शेती विषयक- बी, बीयाणे, औषधे व किराणा हे सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत चालू राहतील. रविवार सह आठवडाभर हॉस्पीटल, मेडीकल, आरोग्य विषयक सेवा अनिर्बंध, आठवडयातील सर्व दिवस सलुन सेवा घरपोच सेवा देता येईल सकाळी 7  ते सायंकाळी 6  वाजे पर्यंत उपरोक्त प्रमाणे ठरवून दिलेल्यानुसार आस्थापना सोशल डिस्टन्स पालन करुन सुरू राहतील आणि आस्थापनेचे चालक,मालक,कर्मचारी, कामगार या सर्व व्यक्तींनी आरोग्य सेतु ॲप वापरणे बंधनकारक आहे. तसेच या व्यतिरिक्त इतर बाबींसदर्भात यापुर्वी लागु करण्यात आलेले प्रतिबंध जसेच्या तसे लागु राहतील, असे ही आदेशात नमुद करण्यात आले आहे.