बीडमध्ये रेशनचा काळाबाजार,  दहा लाखांचा धान्यसाठा जप्त 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या काळात गरीबांसाठी आलेल्या स्वस्त धान्याच्या साठा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात एका गोडाऊनमध्ये पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी आरोपी अरुण मस्के याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

गेवराई येथील राजवीर पेट्रोल पंपाच्या पाठीमागील गोडाऊनमध्ये स्वस्त धान्याचा काळाबाजार करण्यासाठी अवैधरित्या धान्याचा साठा करून ठेवण्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. बुधवारी रात्री अडीच वाजण्याच्या दरम्यान या गोडाऊनवर छापा मारण्यात आला. त्यामध्ये गव्हाच्या प्रत्येकी 50 किलो वजनाचे  462  पोती, तांदळाच्या प्रत्येकी 50 किलो वजनाचे 191 पोती तरव साखरेचे प्रत्येकी पन्नास किलो वजनाचे 12 पोती माल जप्त करण्यात आला आहे. इतर सर्व माल पकडून त्यांची किंमत 10 लाख इतकी आहे.

यावरून नमूद गोदामा मधील अन्नधान्याची शासकीय वितरण प्रणाली द्वारे स्वस्त धान्य दुकानदार यांना शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यासाठी वितरीत केलेले अन्नधान्य असल्याचे निष्पन्न झाले

तसेच गोदामाच्या बाहेर सहा मोठे ट्रक होते. या प्रकरणी गोडाऊनचे मालक अरुण अशोक मस्के याचे विरोधात गुन्हा दाखल केला असून तो फरारी आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.