
कोरोना विषाणूचा धोका दिवसेंदिवस वाढत असून या विषाणूने हिंदुस्थानी लष्करात घुसखोरी केली आहे. कोरोनाच्या विळख्यात अडकून दोन बीएसएफ जवानांचा मृत्यू झाला. गुरुवारी आणखी 41 नवीन रुग्ण समोर आल्याने कोरोनाची बाधा झालेल्या जवानांची संख्या 193 झाली आहे.
Two BSF personnel succumb to COVID-19; 41 new cases take total infections in the force to 193: Officials
— Press Trust of India (@PTI_News) May 7, 2020
दरम्यान, देशभरातील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी आणखी 3561 रुग्ण आढळून आले असून एकूण आकडा 52,952 झाला आहे. गेल्या 24 तासात 89 रुग्णांनी दम तोडला असून मृतांची संख्या 1783 झाली आहे. 15, 267 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून 35,902 रुग्णांवर उपचार सुरू आहे.






















































