राज्यात दिवसभरात 1216 नवे रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या 17 हजार 974 वर – राजेश टोपे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या 17 हजार 97 झाली आहे. गुरुवारी दिवसभरात 1216 नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात गुरुवारी 207 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 3301 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी दिली.

आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या 2 लाख 02 हजार 105 नमुन्यांपैकी 1 लाख 83 हजार 880 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत, तर 17 हजार 974 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 2 लाख 12 हजार 742 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 13 हजार 494 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.राज्यातील विविध रुग्णालयात भरती असलेल्या 8816 रुग्णांचे त्यांच्या लक्षणाच्या तीव्रतेनुसार विश्लेषण करण्यात आले. भरती रुग्णांपैकी 5228 ( 59 टक्के) रुग्ण हे लक्षणे विरहित आहेत. 3209 (36 टक्के) रुग्ण हे सौम्य ते मध्यम लक्षणे असणारे आहेत. तर 424 ( 5 टक्के) रुग्ण हे गंभीर स्वरुपाचे असून त्यातील 236 (3 टक्के) रुग्ण ऑक्सिजनची आवश्यकता असणारे आहेत तर 92 (1 टक्के) रुग्णांना व्हेंटीलेटरची आवश्यकता लागली आहे. उर्वरित 96 रुग्ण इतर कारणांमुळे अतिदक्षता विभागात भरती आहेत.

राज्यात गुरुवारी 43 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णसंख्या 694 झाली आहे. गुरुवारी झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई मधील 24, पुण्यातील 7 , वसई विरार मध्ये 5, सोलापूर शहरात 2, अकोला शहरात1, पालघरमध्ये 1 आणि संभाजीनगर शहरात 1 मृत्यू झाला आहे. याशिवाय मणिपूरमधील 1 आणि बिहारमधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 24 पुरुष तर 19 महिला आहेत. आज झालेल्या 43 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 25 रुग्ण आहेत तर 14 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 4 जण 40 वर्षांखालील आहे. 43 रुग्णांपैकी 29 जणांमध्ये ( 67 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 694 झाली आहे.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांची माहिती (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

  • मुंबई महानगरपालिका: ११,३९४ (४३७)
  • ठाणे: ९३ (२)
  • ठाणे मनपा: ६५० (८)
  • नवी मुंबई मनपा: ६५९ (४)
  • कल्याण डोंबिवली मनपा: २६३ (३)
  • उल्हासनगर मनपा: १४
  • भिवंडी निजामपूर मनपा: २१ (२)
  • मीरा भाईंदर मनपा: १८९ (२)
  • पालघर: ४६ (१)
  • वसई विरार मनपा: १८७ (९)
  • रायगड: ७६ (१)
  • पनवेल मनपा: १२५ (२)
  • ठाणे मंडळ एकूण: १३,७१७ (४७२)
  • नाशिक: ४७
  • नाशिक मनपा: ५४
  • मालेगाव मनपा: ४३२ (१२)
  • नगर: ४४ (२)
  • नगर मनपा: ०९
  • धुळे: ८ (२)
  • धुळे मनपा: २४ (१)
  • जळगाव: ६४ (११)
  • जळगाव मनपा: १४ (२)
  • नंदूरबार: १९ (१)
  • नाशिक मंडळ एकूण: ७१५ (३१)
  • पुणे: १०५ (४)
  • पुणे मनपा: १८९९ (१२२)
  • पिंपरी चिंचवड मनपा: १२५ (३)
  • सोलापूर: ६
  • सोलापूर मनपा: १७७ (१०)
  • सातारा: ९४ (२)
  • पुणे मंडळ एकूण: २४०६ (१४१)
  • कोल्हापूर: १० (१)
  • कोल्हापूर मनपा: ६
  • सांगली: ३२
  • सांगली मिरज कुपवाड मनपा: ३ (१)
  • सिंधुदुर्ग: ४ (१)
  • रत्नागिरी: १६ (१)
  • कोल्हापूर मंडळ एकूण: ७१ (३)
  • संभाजीनगर:३
  • संभाजीनगर मनपा: ३९७ (१२)
  • जालना: ८
  • हिंगोली: ५८
  • परभणी: १ (१)
  • परभणी मनपा: १
  • औरंगाबाद मंडळ एकूण: ४६८ (१३)
  • लातूर: २५ (१)
  • लातूर मनपा: ०
  • धाराशीव: ३
  • बीड: १
  • नांदेड: ३
  • नांदेड मनपा: २९ (२)
  • लातूर मंडळ एकूण: ६१ (३)
  • अकोला: ९ (१)
  • अकोला मनपा: ९० (९)
  • अमरावती: ४ (१)
  • अमरावती मनपा: ६९ (९)
  • यवतमाळ: ९३
  • बुलढाणा: २४ (१)
  • वाशिम: १
  • अकोला मंडळ एकूण: २९० (२१)
  • नागपूर: २
  • नागपूर मनपा: २०४ (२)
  • वर्धा: ०
  • भंडारा: १
  • गोंदिया: १
  • चंद्रपूर: १
  • चंद्रपूर मनपा: ३
  • गडचिरोली: ०
  • नागपूर मंडळ एकूण: २१२ (२)
  • इतर राज्ये: ३४ (८)
  • एकूण: १७ हजार ९७४ (६९४)