मध्य प्रदेशातील मजुरांसाठी गोव्यातून पहिली श्रमिक रेल्वे रवाना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊन 3.0 मध्ये देण्यात आलेल्या शिथिलतेमुळे आपापल्या राज्यात जाण्याची परवानगी गोव्यात अडकून पडलेल्या कामगारांना मिळाल्यानंतर 80 हजार हुन अधिक कामगारांनी आपल्या गावी जाण्यासाठी नोंदणी केली आहे. मध्य प्रदेशमधील ग्वालियर येथे जाणाऱ्या कामगारांसाठी शुक्रवारी पहिली श्रमिक रेल्वे सोडण्यात आली.

उत्तर गोव्यातील थिवी येथील रेल्वे स्थानकातून निघणाऱ्या या विशेष रेल्वेमधून सुमारे 1200 कामगार आणि त्यांचे कुटुंबीय प्रवास करणार आहेत. कामगारांना निवारा केंद्रावरुन कदंबच्या बसेस मधून थिवी स्थानकात आणण्यात आले. बसमधून उतरताच त्यांना जेवणाची पाकिटे देण्यात आली. त्यानंतर स्थानकात प्रवेश करताच त्यांची थर्मल गनद्वारे तपासणी करून पुढे पाठवले जात आहे. गर्दी होऊ नये यासाठी पोलीस आणि प्रशासनाने व्यवस्था केली आहे. स्थानकात आणि स्थानकाबाहेर प्रत्येकात अंतर राखले जावे, यासाठी वर्तुळ आखण्यात आले आहेत. त्याशिवाय सर्व प्रवासी मास्क घालून प्रवास करतील याची खबरदारी घेतली जात आहे. पोलीस महानिरीक्षक परमादित्य यांच्या नेतृत्वाखाली थिवी स्थानक परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मुख्य निवडणूक आयुक्त कुणाल के.परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.