उदगीर येथे आणखी एकजण कोरोनाबाधित आढळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथुन एकूण 28 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून एका व्यक्तीचा अहवाल (Inconclusive) आला असल्यामुळे त्याची 48 तासानंतर पुनर्तपासणी करण्यात येणार आहे . उदगीर येथील रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे लातूर जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे.

लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 8 मे रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत कोरोना बाहयरुग्ण विभागात एकुण 60 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत एकूण 250 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 242 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून यापूर्वीच दिनांक 4 मे रोजी 8 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. ते रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 207 व्यक्तींचा होम क्वॉरंटाईनचा कालावधी समाप्त झाला असून एकूण 43 व्यक्तींना जिल्हा आरोग्य विभागामार्फतहोम क्वॉरंटाईनमध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्ष प्रमुख डॉ. मारुती कराळे यांनी दिली.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत शुक्रवारी एकुण 57 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथून एकूण 28 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून एका व्यक्तीचा अहवाल (Inconclusive) आला असल्यामुळे त्याची 48 तासानंतर पुनर्तपासणी करण्यात येणार आहे. उर्वरीत 26 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बीड 9, उस्मानाबाद 7, निलंगा 4 व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 9 असे एकूण 29 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी सर्वच 29 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.