
कोल्हापूर जिल्ह्यातील आळते (ता.हातकणंगले ) येथील रामलिंग डोंगर परिसरामध्ये शनिवारी सकाळी एक गवा दिसून आल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्तांनीयाची वर्दी तातडीने वन विभागाला दिली. वनविभागाच्या पथकाने स्थानिक तरुणांच्या मदतीने संपूर्ण डोंगर पिंजून काढायला सुरुवात केली आहे.
रामलिंग डोंगरावरील देवस्थानाजवळ गवताच्या कुरणांमध्ये नागरिकांना गवा चरताना दिसला. घाबरलेल्या ग्रामस्तांनी तिथून काढता पाय घेतला आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. गवा दिसल्याचं कळताच देवस्थान परिसरात गर्दी व्हायला लागली. यामुळे गवा तिथून पळून गेला. या परिसरामध्ये अनेक शेतघरे आणि जनावरांचे गोठे असल्याने गव्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
























































