
चंद्रकांत पालकर, पुणे
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. या काळात अनेक जण वेगवेगळ्या शहरात अडकून पडले. आपल्या गावी परतण्यासाठी सर्वांची धडपड सुरू होती. अशा अडचणीत सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी एसीटी वाहतूक आज पासून सुरू करण्यात आली. पुण्यातील स्वारगेट येथून पुणे-नाशिक, पुणे – नगर एसटी सोडण्यात आली.

यासाठी आधी तिकीट बुक करून बसच्या वेळे आधी स्थानकावर पोहोचावे लागते. तिथे डॉक्टर स्क्रीनिंग करतात त्यानंतर प्रवाशांना बसेपर्यंत सोडले जाते. बसमध्ये एकावेळी 22 प्रवासीच प्रवास करू शकत आहेत.



























































