
65 परप्रांतीयांना घेऊन बुलढाण्यातील मेहकर आगाराच्या 3 बसेस सोमवारी सायंकाळी 7 वाजता नागपूरकडे रवाना झाल्या आहेत. आर.टी.ओ.विभाग व एस.टी. प्रशासनाकडून रविवारपासून मेहकर ते देऊळगावराजा रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या परप्रांतीयांना मेहकर येथे आणून त्यांना मेहकर आगाराच्या बसेसने नागपूर समोरील खवसा चेक पोस्ट पर्यत पोहोचविणे शासन आदेशानुसार सुरू आहे.
रविवारी सायंकाळी 66 प्रवाशांना घेऊन 3 बसेस पाठविण्यात आल्या, तर सोमवारी सायंकाळी 7 वाजता 65 परप्रांतीयांना घेऊन 3 बसेस पाठविण्यात आल्या. यावेळी सर्व प्रथम ग्रामीण रूग्णालयात त्यांची प्राथमिक तपासणी झाली. हे परप्रांतीय मध्य प्रदेश, ओडिशा, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड राज्याचे रहिवासी आहेत.

























































