
राज्य परिवहन महामंडळाच्या नगर विभागास लॉकडाऊनच्या काळामध्ये मोठा फटका सहन करावा लागत आहे. दीड महिन्यापासून वाहतुक बंद असल्याने नगर विभागाचे रोज सुमारे 70 लाख रुपयांचे उत्पन्न बुडत आहे.
नगर विभागाच्या दररोजच्या दररोजच्या जवळपास चार हजार 200 फेर्या बंद आहेत. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रदुर्भावामुळे राज्यतील एसटी वाहतूक बंद केली आहे. राज्यात सुमारे 17 हजार 500 बसद्वारे प्रवासी वाहतूक होते. यामध्ये नगर विभागात 750 बस आहेत. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून वाहतूक बंद आहे. त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्न मिळत नाही.
आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. नगर जिल्ह्यातील रोजच्या चार हाजर 200 फेर्या बंद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात दररोज किमान दोन लाख 40 हजार किलोमीटर बस धावतात. जिल्ह्यातील शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात वाहतूक केली जाते. सध्या कोरानोच्या पार्श्वभूमीवर वाहतूक बंद असल्याने नगर विभागात उत्पन्न मिळालेले नाही. राज्यभरात अशीच परिस्थिती आहे.
त्यामुळे महामंडळास उत्पन्न मिळाल्याने मार्ग बदं झालेले आहेत. त्यामुळे आर्थिक नियोजन करताना कसरत करावी लागत आहे. तरीसुध्दा सध्या करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखणे हेच ऐकमेव उद्दिष्ट आहे. त्यानुसार राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. शहरी आणि ग्रमिण प्रतिबंधांत्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. राज्य परिवहन महामंडळ सुध्दा यामध्ये आपले कर्तव्य बजावत आहे. महामंडळामार्फत जनजागृती करण्यात येत आहे.























































