
सोलापूर जिल्ह्यात आज कोरोनाचे 22 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 330 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे.
गुरूवारी 121 जणांचे अहवाल प्राप्त झाले यात 99 निगेटिव्ह तर 22 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. यात 8 पुरूष आणि 14 महिलांचा समावेश आहे. तसेच एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 3713 जणांचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी घेण्यात आले. यातील 3481 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 3151 निगेटिव्ह तर 330 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.
आत्तापर्यंत पॉझिटिव्ह रूग्णांत 181 पुरूष तर 149 महिलांचा समावेश आहे. तर मृत 22 मध्ये 11 पुरूष, 11 महिलांचा समावेश आहे. आता पर्यंत एकूण 106 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.


























































