
कावलगावाकडून पुर्णेकडे दुचाकीवरून जाणारा 14 हजार रुपये किंमतीचा गोवा गुटखा चुडावा पोलिसांनी शुक्रवारी पकडला. पूर्णा तालुक्यातील गुटखा तस्कर नांदेड येथून गुटखा घेऊन कावलगाव चांगेफळ परिसरातून छुप्या मार्गाने गुटख्याची तस्करी करत असल्याची माहिती चुडावा पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन चुडावा पोलीस ठाण्याचे सपोनी शिवाजी देवकते यांच्या आदेशानुसार कावलगाव बिट जमादार सूर्यकांत केजगीर, भारत सावंत, टोटेवाड आदींनी गुरुवारी सकाळी कावलगावात सापळा रचून नांदेड येथून पुर्णेकडे छुप्या मार्गाने दुचाकीवरून एक तरुण गुटख्याने भरलेली बॅग घेऊन जात असताना दुचाकीसह पकडला. या बॅगेची पाहणी केली असता गोवा गुटख्याचे 14 हजार रुपयाचे 40 पुडे आढळून आले. पोलिसांनी दुचाकीसह गुटखा जप्त केला आहे.




























































