
शुक्रवारी संध्याकाळपर्यंत कोरोना संसर्ग तपासणीचे 161 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 150 अहवाल निगेटीव्ह तर 11 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधित व्यक्तींची एकूण संख्या 218 झाली आहे. दरम्यान काल रात्री उशीरा 28 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच उपचारादरम्यान दोन महिला मयत झाल्या आहेत. त्यामुळे आजअखेर प्रत्यक्षात 101 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण 2363 नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 2145 अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण 1927 अहवाल निगेटीव्ह तर 218 अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व 218 अहवाल प्रलंबित आहेत.
आज 11 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात प्राप्त झालेल्या 161 अहवालात 150 अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर 11 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज सकाळी पॉझिटिव्ह आढळलेला एक रुग्ण हा निसर्ग सोसायटी खडकी येथील रहिवासी असून 35 वर्षीय पुरुष आहे. तर सायंकाळी पॉझिटीव्ह आढळलेल्या 10 पॉझिटीव्ह रुग्णात पाच जण महिला व पाच पुरुष आहेत. त्यातील चार जण आंबेडकर नगर न्यू बसस्टॅण्ड मागे येथील तर दोन फिरदौस कॉलनी, दोन भिम चौक अकोट फैल येथील तर गवळीपुरा व पंचशिल नगर वाशीम बायपास येथिल प्रत्येकी एक जण रहिवासी आहेत.
दरम्यान आज पॉझिटीव्ह अहवाल प्राप्त झालेली फिरदौस नगर मधील महिला ही काल मयत झाली होती. ही महिला 12 मे रोजी दाखल झाली होती. तर आज सकाळी आणखी एक महिला मयत झाली. ही 65 वर्षीय महिला मोमीनपुरा येथील रहिवासी असून ती 11 मे रोजी दाखल झाली होती.
28 जणांना डिस्चार्ज पैकी 24 निरीक्षणात
काल रात्री व आज सकाळी उपचार पूर्ण झालेल्या 28 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यातील चौघे जणांना घरी सोडण्यात आले. ते आता घरातच पण क्वारंटाईन राहतील तर अन्य 24 जणांना पीकेव्ही मधील कोवीड केअर सेंटर मध्ये निरीक्षणात ठेवण्यात येणार आहे.




























































