
पुणे विभागातील 2 हजार 218 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून विभागात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 4 हजार 593 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 2 हजार 146 आहेत. विभागात एकूण 229 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 168 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे जिल्हयातील 4 हजार 1 कोरोनाबाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 1 हजार 960 रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. ॲक्टीव रुग्णसंख्या 1 हजार 842 आहे. कोरोनाबाधित 199 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 157 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. कोरोनाबाधित रूग्णाच्या संख्येमध्ये पुणे जिल्हयात 281,सोलापूर जिल्हयात 25 ,कोल्हापूर जिल्हयात 7, सांगली जिल्हयात 6 व सातारा जिल्हयात 3 अशी वाढ झाली आहे. सातारा जिल्हयातील 129 कोरोनाबाधित रुग्ण असून 66 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 61 आहे. कोरोनाबाधित 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 378 कोरोनाबाधित रुग्ण असून 150 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 202 आहे. कोरोनाबाधित एकूण 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयातील 50 कोरोनाबाधित रुग्ण असून 32 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्णसंख्या 17 आहे. कोरोना बाधित एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 35 कोरोनाबाधित रुग्ण असून 10 बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्णसंख्या 24 आहे. कोरोनाबाधित एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यत विभागामध्ये एकूण 49 हजार 27 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 42 हजार 294 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 6 हजार 733 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. मिळालेल्या अहवालांपैकी 37 हजार 866 नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 4 हजार 593 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे. आतापर्यंत विभागामधील 1 कोटी 12 लाख 32 हजार 344 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 4 कोटी 81 लाख 15 हजार 524 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 3 हजार 56 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
























































