
लॉकडाऊनमध्ये पुण्यात अडकल्याने आपल्या भावाकडे राहत असलेला व्यक्ती पायी गावाकडे जात असताना आष्टी शिवारात मृत्यू मुखी पडला आहे. लॉकडाऊमध्ये एक उसतोड मजूर पुण्यातच अडकला होता. पायी गावाकडे निघाला असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला आहे. नातेवाईक येऊ शकत नसल्याने शवविच्छेदनानंतर तेथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. ही दुर्दैवी घटना बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात घडली.
तालुक्यातील धानोरा शिवारात पत्र्याचे शेड मध्ये एक 40 वर्ष वयाचे पुरुषाचे प्रेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सदर ठिकाणी जाऊन पाहणी केल्यानंतर याठिकाणी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. मृत व्यक्तीच्या कपड्यांमध्ये असलेल्या चिठ्ठीतील मोबाईल नंबर वर संपर्क केला असता सदर इसम हा पिंटू मनोहर पवार असल्याचे कळाले. पवार परभणी जिल्ह्यातील रहिवासी असून ऊसतोड मजूर होते. पवार ऊस तोडी संपल्यानंतर पुणे येथे त्यांच्या भावाकडे राहत होते. परंतु लॉक डाऊनमध्ये अडकल्यामुळे त्यांना गावी जाता येत नव्हते. त्यामुळे पवार पुण्याहून एक आठवड्यापूर्वी पायी गावी निघाला होते.
मृतांच्या नातेवाईकांना त्याचे मृतदेह घेऊन जाणे शक्य नसल्याचे सांगितल्यांने त्यांचे शवविच्छेदन करून त्याच ठिकाणी नातेवाईकांच्या परवानगीने पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.





























































