बीड जिल्ह्याला मोठा दिलासा; 50 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह, 7 अहवालांची प्रतीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्यातून पाठवण्यात आलेल्या स्वॅबपैकी 50 जणांचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आले आहेत तर 7 जणांच्या रिपोर्टची प्रतिक्षा आहे. या 7 जणांचे अहवाल मंगळवारी येण्याची शक्यता आहे. 50 जणांचे स्वॅब कोरोना निगेटिव्ह आल्याने बीड जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. बीड जिल्ह्यातून सोमवारी 57 जणांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या रूग्णांचे रिपोर्ट रात्री उशिरा मिळाले. त्यातील 50 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 7 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. प्रलंबित अहवालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

मुंबईहून चार दिवसांपूर्वी आलेल्या 42 वर्षीय मानसिक रूग्णाचा कॉरंटाईनमध्ये असताना घरातच मृत्यू झाला होता. ही घटना रविवारी सायंकाळी बीड तालुक्यातील राजुरी येथे घडली होती. मुंबईहून आलेल्या या रूग्णाचाही स्वॅब घेण्यात आला होता. त्या स्वॅबचा अहवालही आला आहे. मृत रूग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. बीडच्या जिल्हा रूग्णालयामध्ये कोरोनाबाधित 39 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये 2 रूग्ण गंभीर आहेत, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी सांगितले.