
कळंब तालुक्यातील निपाणी येथील एका शेतकऱयाने कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या आठवडय़ात 20 मे रोजी कळंब तालुक्यातील नागुलगाव येथील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच तालुक्यातील निपाणी येथील शेतकरी मुकूंद संदिपान गुंड (40) या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे कोरोना व कोरोनामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती आणखी किती बळी घेणार असा प्रश्न पडला आहे.
मुकूंदृ गुंड हे सोमवार, 25 मे रोजी सकाळी दहा वाजता शेतात गेले व दुपारी दोन वाजता शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मयत मुकुंद संदिपान गुंड यांना सहा मुली असून दोन मुलींचे लग्न झाले आहे. परंतु उर्वरित चार मुलींचे लग्न कसे करावे, केवळ दोन एकर जमीन व एसबीआय बँकेचे कर्ज कसे फेडावे या धास्तीने व सततच्या नापिकीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.






























































