
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दररोज दीड हजारांच्या संख्येने वाढणारा कोरोना रुग्णांचा आकडा आज काहीसा खाली आला असून नवीन 1002 रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्णांची संख्या 32 हजार 791 वर पोहोचली आहे. तर 39 जणांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांची संख्याही 1065 झाली आहे.
मुंबईत मृत्यू झालेल्या 39 रुग्णांमध्ये 28 पुरुष आणि 11 महिलांचा समावेश आहे. यामधील 25 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृतांमधील 12 जणांचे वय 60 वर्षांहून जास्त होते तर 23 रुग्ण 40 ते 60 आणि चार रुग्ण 40 वर्षांहून कमी वयाचे होते. दरम्यान, मुंबईत गेल्या एकाच दिवसात ४१० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनामुक्त होणार्यांची संख्या 8814 झाली आहे.





























































