रत्नागिरीत कोरोनाबाधितचा आकडा दोनशे पार, आणखी १२ रूग्ण सापडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येने दोनशेचा आकडा पार केला आहे.जिल्ह्यात आज आणखी १२ कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहेत.त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या २०८ वर पोहचली आहे.

आज रात्री उशीरा १२ तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यामध्ये संगमेश्वर तालुक्यातील चार,रत्नागिरी आणि दापोलीतील प्रत्येकी तीन आणि कामथे येथील दोन रूग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या २०८ झाली असून १२६ जण रूग्णालयात उपचार घेत आहेत.पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ७७ जणांना बरे झाल्यानंतर डिश्चार्च देण्यात आलाय.