
कोरोना व्हायरसमुळे 16 मार्चपासून देशभरातील शाळा कॉलेजेस बंद आहेत. जून महिना आला तरी शाळा कधी सुरू होणार याबाबत अद्याप काहीच समजलेले नसताना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल याबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. देशभऱातील शाळा या ऑगस्ट महिन्यानंतर सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. नुकतंच एका मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली असून इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
दरम्यान सुरुवातीला ग्रीन व ऑरेंज झोनमधील शाळा सुरू होणार असून तिथेही सोशल डिस्टंन्सिंग बंधनकारक असणार असल्याचे समजते. अद्याप याबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र या महिनाभरात शाळांबाबत सरकार निर्णय घेणार असल्याचे समजते.




























































