एक डोळा असुनही परमेश्वर काळे यांनी केला मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात डोळे हे अत्यंत महत्त्वाचे असतात. आपण एक मिनीट सुद्धा डोळे बंद करून राहू शकत नाहीत. नेत्रहीन व्यक्तींना देखील दृष्टी मिळावी यासाठी सध्या मरणोत्तर नेत्रदान करा याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. 10 जून हा जागतिक नेत्रदान दिन आहे. त्यानिमित्ताने बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील परमेश्वर आसाराम काळे यांनी आपल्या आईसह मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला आहे. महत्त्वाचे म्हणजे परमेश्वर यांना फक्त एकाच डोळ्याने दिसते. असे असतानाही त्यांनी हा मोठेपणा दाखवा आहे.

परमेश्वर आसाराम काळे हे गेवराई तालुक्यातील नामांकित जयप्रकाश नागरी सहकारी पतसंस्था या ठिकाणी कार्यरत आहेत. ते तलवाडा शाखेत शिपाई पदापासून ते अगदी आज शाखा व्यवस्थापक पदापर्यंत आपल्या जिद्दीच्या जोरावर पोहचलेले आहेत. त्यांना फक्त एकाच डोळ्याने दिसत असतानाही त्यांनी हा धाडसी तसेच कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. त्यांच्या जिद्दीची दखल घेऊन संघर्ष सामाजिक मंच महाराष्ट्र राज्य यांनी यावर्षी संघर्ष साथी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. काळे यांच्या या निर्णयाचे जयप्रकाश नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीनारायणजी अट्टल उपाध्यक्ष मुरलीधरजी घोडके संचालक, अनुरागजी अट्टल स्थानिक संचालक सुनील गवांडे नजीर कुरेशी, विठ्ठल शिंगणे, नितिन पखाले ,विकरम लाड, दत्तु नागरगोजे, रोखपाल जीवन सिरसट, लिपिक ब्रम्हनाथ कोकरे,आबा बहिर, यांनी अभिनंदन केले आहे.