
मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत कुडाळ शहरासाठी ४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यामधील २ कोटींचा निधी कै.मच्छिंद्रनाथ कांबळी नाट्यगृह इमारतीच्या बांधकामासाठी मंजूर करण्यात आला आहे. कुडाळ लक्ष्मीवाडी महापुरुष मंदिर शेजारी भंगसाळ नदी उद्यान विकसित करण्यासाठी १ कोटीचा निधी तर कुडाळ शहरातील अंतर्गत रस्ते आणि गटार दुरुस्तीसाठी १ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी आ. नाईक यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली
आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुडाळ शहरात १२ कोटीच्या निधीतून अद्यावत असे कै.मच्छिंद्रनाथ कांबळी नाट्यगृह उभारले जाणार आहे. यासाठीचा निधी त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून मंजूर करून घेतला आहे. यातील ४ कोटींचा निधी याआधी वर्ग झाला आहे. व आता २ कोटींचा निधी आ.वैभव नाईक यांनी ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून मंजूर करून घेतला आहे. तसेच कुडाळवासियांना विरंगुळ्याचे ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आ. वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून महापुरुष मंदिर भंगसाळ नदी येथे उद्यानाची निर्मिती करण्यात येत आहे. याआधी या कामासाठी २ कोटींचा निधी वर्ग करण्यात आला आहे. व आता १ कोटी निधी मंजूर करण्यात आला असून एकूण ३ कोटीच्या निधीतून हे उद्यान विकसित होणार आहे.
कुडाळ नगराध्यक्ष सर्व नगरसेवक शिवसेना पदाधिकारी यांनी कुडाळ शहरातील अंतर्गत रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. त्यामागणीची दखल घेऊन आमदार वैभव नाईक यांनी १ कोटीचा निधी मंजूर करून आणला आहे. हि कामे लवकरच मार्गी लावली जाणार आहेत. ना. एकनाथ शिंदे यांनी लॉकडाऊन कालावधीतही तातडीने हा निधी दिल्याने आ. वैभव नाईक यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

































































