वर्तमानपत्र वाटप करणाऱ्यांना शिवसेनेकडून मदतीचा हात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या माध्यमातून विभाग क्र. 2 मध्ये कांदिवली पूर्व, चारकोप आणि मालाड विभागात वर्तमानपत्र वाटप करून उदरनिर्वाह करणाऱ्यांच्या कुटुंबीयांना धान्यवाटप करण्यात आले. विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी चारकोप विधानसभा संघटक  संतोष राणे उपविभागप्रमुख राजू खान, रविंद्र वेदपाठक,  प्रदीप ठाकूर, कार्यालय प्रमुख प्रदीप वस्त व ज्येष्ठ शिवसैनिक शिंदे आदी उपस्थित होते.