
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली आहे. मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली आहे. रविवारी दुपारी ही घटना उघडकीस आली.
Bollywood Actor Sushant Singh Rajput commits suicide at his residence in Mumbai pic.twitter.com/Z6l5BzrmE5
— ANI (@ANI) June 14, 2020
पाच दिवसांपूर्वी सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सलीयन हिनेही मुंबईतील एका इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. मालाड येथील इमारतीच्या 14 व्या मजल्यावलवरून तिने उडी घेतली होती. पोलिसांनी या संबंधात सुशांत सिंह राजपूत याचीही चौकशी केली होती. तेव्हापासून तो नैराश्यात होता.
सुशांत सिंह राजपूत याने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते, तर ‘काय पो छे’ हा त्याचा बॉलीवूडमधील पहिला चित्रपट होता. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या आयुष्यावर आधारित ‘धोनी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. तसेच त्याचा केदारनाथ हा चित्रपटही प्रचंड गाजला होता. ‘छिछोरे’ या चित्रपटात तो अखेरचा दिसला.



























































