सुशांत सिंह राजपूतची अखेरची पोस्ट व्हायरल, आईची आठवण काढत व्यक्त केल्या होत्या भावना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने वयाच्या 34 व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घरातील नोकराने फोन करून पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्याने आत्महत्या नक्की कोणत्या कारणांनी केली याचा उलगडा होऊ शकलेला नाही. मात्र काही दिवसांपासून तो नैराश्यात असल्याचे कळते. याच दरम्यान त्याने सोशल मीडियावर केलेली अखेरची पोस्ट व्हायरल होत आहे. यातून त्याच्या मनाची चलबिचल स्पष्ट दिसत आहे.

अभिनेता सुशांतने 10 दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. ‘धूसर भूतकाळ हा डोळ्यातून पाझरतो. न संपलेली स्वप्न आणि हे वेगवान जीवन हात्स्यरेषा कोरतात.. या दोघांमध्ये मी हिंदकळतोय…’, अशी पोस्ट सुशांतने केली होती. यासोबत त्याने आईचा फोटो आणि पोस्टमध्ये आईचा उल्लेख केला होता. त्याची आई तो 16 वर्षांचा असताना त्याला सोडून देवाघरी गेली होती. आईचा लाडका असलेल्या सुशांतने अनेकदा सोशल मीडियावर तिच्याप्रति आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.