
सुशांत सिंह रजपूतने नैराश्यात होता. त्यातच सुशांतने आत्महत्या केली. सुशांतपूर्वी अनेक बॉलिवूड कलाकारही नैराश्याच्या गर्तेत होते. परंतु उपचार आणि समुपदेशनामुळे या कलाकारांनी नैराश्यावर मात करत आपली कारकीर्द पुन्हा सुरू केली.
दिपीका पदुकोण
सुप्रसिद्ध अभिनेत्री दिपीका पदुकोणही ही सुद्धा नैराश्याने ग्रासली होती. 2015 साली खासगी आणि व्यावसायिक कारणामुळे दिपीका नैराश्यात होती. नंतर उपचार आणि समुपदेशनामुळे ती नैराश्यातून बाहेर आली.
अनुष्का शर्मा
अभिनेत्री आणि निर्माती अनुष्का शर्माही कधी नैराश्यात होती. नैराश्य आणि anxiety सारख्या आजारांबाबत आपण बोललं पाहिजे असे तिने ट्विटरवर म्हटले होते.
वरुण धवन
वरुणने बदलापूरमध्ये एका निराश व्यक्तिरेखा बजावली होती. या व्यक्तिरेखेचा वरुणवर खूप प्रभाव पडला होता. खर्या आयुष्यातही तो निराश होऊ लागला होता.
करण जोहर
निर्माता, होस्ट, लेखक, फॅशन डिझायनर करण जोहरसुद्धा नैराश्यात होता. अनेकवेळा कॉफी विथ करणच्या चित्रीकरणादरम्यान करणचे समुपदेशन केले जात होते.
इलियाना डीक्रूज
सुप्रसिद्ध अभिनेत्री इलियाना डीक्रूजसुद्धा नैराश्यात होती. इलियानाला Body Dysmorphic Disorder आणि नैराश्य असे आजार झाले होते. त्यामुळे तिचे वजनही खूप वाढले होते.
शाहरुख खान
बॉलिवूडचा किंग खान सुध्दा नैराश्यात होता. 2010 साली शाहरुखच्या खांद्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे शाहरुखला खुप वेदना झाल्या होत्या. त्यामुळे शाहरुख नैराश्याच्या गर्तेत होता. पण लवकरच तो या आजारातून बरा झाला.


































































