
छत्तीसगड पोलिसांनी भाजप नेता जगत पुजारी आणि त्याच्या सहकार्याला अटक केली आहे. दोघेही नक्षलग्रस्त भाग दंतेवावाडामध्ये माओवाद्यांना सामान पोहोचवत होते. पुजारी दंतेवाडाच्या भाजप शहाराच्या उपाध्यक्ष आहे.
जनसत्ता या वेबसाईटने याबाबत वृत्त दिले आहे. जगत पुजारी आणि त्याचा साथीदार रमेश उसेंडी हा माओवाद्यांना अबुझमाड भागात सामान पुरवत होता. त्यात ट्रॅक्टर आणि इतर साहित्याचा समावेश आहे. तसेच पुजारीने माओवाद्यांसाठी एक ट्रॅक्टरही खरेदी केला होता. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी या दोघांवर बजार ठेवली होती. शनिवारी पोलिसांनी बारसूर-चित्रकूट मार्गावर या दोघांना अटक केली. या ट्रॅक्टरसाठी पुजारीला माओवाद्यांकडून चार लाख रुपये मिळणार होते.































































