इस्लामाबादमध्ये बेपत्ता झालेले हिंदुस्थानी अधिकारी ISI च्या ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज सकाळपासून पाकिस्तानच्या इस्लामाबादमधून हिंदुस्थानचे दोन अधिकारी बेपत्ता होते. दोन्ही अधिकारी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या ताब्यात असल्याची माहिती समोर आली आहे.

NDTV या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. हिंदुस्थानचे दोन कर्मचारी बेपत्ता असल्याचे पाकिस्तानी अधिकार्‍यांना सांगण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानी दूतांना ही माहिती दिली होती. दोन्ही कर्मचारी सकाळी 8 वाजल्यापासून बेपत्ता होते.

एक आठवड्यापूर्वी दिल्लीत पाकिस्तानच्या उच्च आयोगात दोन अधिकार्‍यांना गुप्तहेरीप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर या दोन अधिकार्‍यांची रवानगी पाकिस्तानमध्ये करण्यात आली होती. दोन्ही अधिकारी खोटे आधार कार्ड घेऊन दिल्लीमध्ये फिरत होते. त्यानंतर हिंदुस्थानचे अधिकारी पाकिस्तानमध्ये बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. तर पाकिस्तानमध्ये हिंदुस्थानी उच्च आयोगचे अधिकारी गौरव अहलुवालिया यांचा आयएसआयचे गुप्तहेर पाठलाग करत असल्याचे समोर आले होते.