ग्राहकांनी डुप्लिकेट वीज बिलासाठी गर्दी करू नये! महावितरणचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वीज ग्राहक सध्या आपले तीन महिन्यांचे वीज बिल जाणून घेण्याकरिता डुप्लिकेट बिलाची प्रत मिळणविण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात गर्दी करत आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होत आहे. त्याची महावितरणने गंभीर दखल घेतली असून ग्राहकांनी डुप्लिकेट बिलासाठी महावितरणच्या कार्यालयात गर्दी करू नये असे आवाहन केले आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महावितरणने गेल्या तीन महिन्यांपासून ग्राहकांच्या वीज वापराचे मीटर रिडिंग घेणे बंद होते. तसेच बिलाचे वाटपही केले केलेले नाही. मात्र आता मीटर रिडिंग सुरू केल्याने ग्राहकही महावितरणच्या कार्यालयात आपले बिले जाणून घेण्यासाठी गर्दी करत आहेत. मात्र ग्राहकांनी गर्दी टाळावी. तसेच आपले वीज बिल जाणून घेण्यासाठी आपला मोबाईल क्रमांक नोंदणी करावा. त्यानंतर सदर क्रमांकाकरून मिस्ड कॉल दिल्यानंतर वीज बिलाची रक्कम एसएमएसने कळू शकणार आहे. महावितरणच्या संकेतस्थळाकर ग्राहक क्रमांक टाकूनही वीज बिलाची रक्कम जाणून घेता येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.