महाराष्ट्रात एका दिवसात कोरोनाचे 3752 नवे रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात 3752 नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मागच्या चोवीस तासांमधली ही संख्या आहे. तर 24 तासांमध्ये 100 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांमध्ये 1672 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत 60 हजार 838 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्याच्या घडीला 53 हजार 901 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन दिली आहे.

मुंबईत कोरोनाचे 1298 रुग्ण
मुंबईत गेल्या एकाच दिवसांत 1298 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 67 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या एकाच दिवसांत 518 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे एकूण कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या आता 31 हजार 856 वर पोहोचली आहे. मुंबईत मृत झालेल्या 67 जणांमध्ये 46 पुरुष आणि 21 महिलांचा समावेश आहे. मृतांमधील 32 जणांचे वय 60 वर्षांहून जास्त होते. तर 28 रुग्ण 40 ते 60 वर्षे वयोगटातील आणि 7 रुग्ण 40 वर्षांपेक्षा कमी कयाचे होते. मृतांमधील 49 जणांना काही दीर्घकालीन आजारही होते.