शिवसेनेचा ‘बँक आपल्या दारी’ उपक्रम, 400 लाभार्थीना एकाच ठिकाणी पेन्शनचे वाटप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बँक आपल्या दारी उपक्रमाच्या दुस-या टप्प्यात करवीर तालुका शिवसेनेच्या पूढाकारातुन आज उचगाव येथे 400 लाभार्थी पेन्शनधारकांना एकाच ठिकाणी वाटप करण्यात आले. यापुढे कायमस्वरूपी गावातच येऊन बँकामार्फत जेष्ठ नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे करवीर तालुका प्रमुख राजु यादव यांनी सांगितले.

संजय गांधी, श्रावण बाळ, वृद्धापकाळ, इंदिरा गांधी आदी शासनाच्या विविध योजनांद्वारे उचगाव सह परिसरातील नागरिकांना जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेच्या मार्केट यार्ड शाखेत पेन्शन दिली जाते. बँकेत जाण्यासाठी थेट बससेवा नसल्याने, चालत जाण्यासह रिक्षाने जावे लागते. याचा आर्थिक फटका तर बसतोच शिवाय पेन्शन धारकांना संध्याकाळीच घरी परतावे लागते.

सध्या कोरोनामुळे बँकेच्या दारामध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच सोशल डिस्टनसिंग व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करवीर शिवसेनेच्या वतीने बँक आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गेल्या महिन्यात या उपक्रमातुन साडेतीनशेहुन अधिक पेन्शनधारकांनी लाभ घेत शिवसेनेच्या या उपक्रमाचे कौतुक केले होते.

यंदाही दुसऱ्या टप्प्यात आज उचगाव येथील मंगेश्वर मंदिरात शिवसेना जिल्हाप्रमुख व आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार,करवीर तालुका प्रमुख राजू यादव तसेच बँकेचे मॅनेजर सुभाष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत 400 हुन अधिक जेष्ठ लाभार्थी पेन्शनधारकांना निधी वाटप करण्यात आले.